'रात्रीस खेळ चाले'चा व्हॉटसअॅपवर व्हॉयरल झालेला शेवट 'तो' नाही !

'रात्रीस खेळ चाले'चा व्हॉटसअॅपवर व्हॉयरल झालेला शेवट 'तो' नाही !

  • Share this:

6 ऑक्टोबर : 'झी मराठी'वरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आता ही मालिका आपल्या क्लायमेक्सच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. पण, सध्या सोशल मीडियावर नीलिमा वहिणी आणि सुशल्याला अटक करण्यात आली असल्याचे फोटो व्हायरल झाले आहे. पण, हा खरा शेवट नाहीये. अजून शेवट बाकी आहे.

Ratris Khel Chale'कोकणातली भूत एकदा मागे लागली की सोडता नाय' असा दाखला घेऊन छोट्या पडद्यावर 'रात्रीस खेळ चाले' मालिकेनं दहशत निर्माण केली. विशेष म्हणजे कोकणी लहेजा आणि नवख्या कलाकारांना घेऊन या मालिकेनं सुरुवात केली आणि थोड्याच अवधीत लोकप्रियतेचा शिखर सर केला. पण, कोकणाचं पर्यटन आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याच्या आरोपामुळे 'रात्रीस खेळ चाले' मालिकेला विरोधही झाला. मनसे आणि शिवसेनेनं ही मालिका बंद करावी अशी मागणीच घातली. पण असा कोणताही प्रकार होणार अशी ग्वाही दिग्दर्शकांनी दिली. त्यानंतर या मालिकेनं कोकणासह महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना झपाटलं. बघता बघता रात्रीस खेळ चालेनं 200चा टप्पाही पार केला.

पहिल्या भागात नाईक कुटुंबातल्या अण्णांचा झालेला मृत्यू आणि त्यानंतरच्या गूढ घटना उत्सुकता वाढवत होत्या. जमिनीच्या वादावरुन नेने वकीलांचा खून झाला. त्याचा तपास करण्यासाठी अभिरामचा मित्र विश्वसराव हा पोलीस निघतो. तळघरात सापडलेले सांगाडे, आणि छायाच्या लग्नाच्या दिवशी अजयचा खून होणे हे मालिकेला निर्णायक वळण देणारे ठरले. नाईक कुटुंबातल्या रहस्यमय घटनांचा खरा सूत्रधार कोण ? याची उत्कंठा प्रेक्षकांमध्ये वाढली. पण असं असताना ही मालिका आता 22 ऑक्टोबरला निरोप घेतेय.

वकील नेने आणि अजयचा खुनी सापडला, असं सांगणारे फोटोज सध्या व्हॉयरल होतायत. त्या फोटोवरून सुशल्या आणि नीलिमा वहिनीना अटक झाल्याचं दिसतंय. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मालिकेचे वेगवेगळे शेवट आहेत. प्रत्येक पात्रांबरोबरचा वेगळा शेवट असणार आहे. अभिराम, दत्ता, पांडू, ऱघुकाका या सगळ्याबद्दलचा खुलासा होऊन शेवट 'गोड' होणार आहे.  त्यामुळे रात्रीस खेळ चालेच्या चाहत्यांनी थोडा धीर धरावा आणि शेवटचा आनंद घ्यावा.

दरम्यान, या मालिकेच्या जागी 24 ऑक्टोबरपासून हंड्रेड डेज ही मालिका सुरू होतेय. या मालिकेतून आदिनाथ कोठारे पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर येतोय. त्याच्या सोबत तेजस्विनी पंडित आहे. ही मालिकाही रहस्यमय, थरारक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: October 6, 2016, 7:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading