S M L

अॅट्रोसिटी कायदा कडक करा, बारामतीत दलित समाजाचा विराट मूकमोर्चा

Sachin Salve | Updated On: Oct 6, 2016 07:39 PM IST

अॅट्रोसिटी कायदा कडक करा, बारामतीत दलित समाजाचा विराट मूकमोर्चा

06 ऑक्टोबर : अॅट्रोसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी आज बारामतीत दलित समाजाने विराट मोर्चा काढला. या मोर्च्यात लाखोंच्या संख्येनं दलित समाजाची बांधव एकत्र सहभागी झाले होते. मराठा समाजाने मोर्चा काढून केलेल्या सर्व मागण्या या मोर्चातही करण्यात आल्या होत्या. मात्र अॅट्रोसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावीही मागणी मात्र मांडण्यात आली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून इंदापूर चौक ते कसबा पेठेतून बारामतीतील मुख्य तीन हत्ती चौक मार्गाने मिशन हायस्कुल मैदानात मोर्चेकरी जमा झाले होते.

अॅट्रोसिटी कायदा मागासवर्गीयांचे कवच कुंडल असून त्याला हात लावल्यास आमच्यावरील अन्याय अत्याचारात वाढ होईल म्हणून या कायद्याला कोणी हात लावू नये मात्र कायद्याची अंमलबजावणी कडक स्वरूपात केली जावी अशी मागणी मोर्चात सहभागी झालेले महिला आंदोलकांनी केली. या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 6, 2016 07:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close