S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

पवारांचा भाजपवर 'सर्जिकल स्ट्राईक', इतका गवगवा कशाला?

Sachin Salve | Updated On: Oct 6, 2016 05:19 PM IST

sharadpawar-kc8F--621x414@LiveMint06 ऑक्टोबर : देशाची सुरक्षा वेगळी आणि राजकारण वेगळे आहे. सर्जिकल स्ट्राईकचंआम्ही कधी राजकारण केलं नाही. पण भाजपने जणू सीमेवर जाऊन आम्हीच सर्जिकल स्ट्राईक केला असा गावभर गवगवा केलाय असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला. तसंच मराठा मोर्चा हा आमच्या विरोधात नाही तर भाजप सरकार विरोधात आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापित आणि विस्थापित समजावून घ्यावं असा सल्लवजा टोलाही पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नागपूर विभागीय पदाधिका•यांचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नागपूरच्या आमदार निवासाच्या प्रांगणात पार पडला. महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर या मेळाव्यात शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्याचं लक्ष लागले होते. सध्या सर्जिकल स्ट्राईकवर पेटलेल्या राजकारणावर शरद पवारांनी खरपूस समाचार घेतला.

मी संरक्षण मंत्री होतो त्यामुळे मला माहिती आहे. मनमोहन सिंह पंतप्रधान असतांना चार वेळा सर्जिकल स्ट्राईक केले. मात्र उघड केले नाही. कारण काही गोष्टी लिक करायच्या नसतात. आज भाजपचे नेते गावभर सांगत फिरत आहेत, जणू काही यांनीच पाकिस्तानच्या सीमेत जाऊन सर्जिकल स्ट्राईक केले असा टोला शरद पवारांनी भाजपला लगावला.'मुख्यमंत्र्यांनी जरा समजून घ्यावं'

त्यानंतर शरद पवारांनी आपला मोर्च्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा मोर्च्याकडे वळवला. आता आम्ही सत्तेत नाहीत म्हणून विस्थापित आहोत. मुख्यमंत्र्यांनी आता हे समजावून घ्यावं की प्रस्थापित आणि विस्थापित कोण असतं असा टोला शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

'मराठा आरक्षणासाठी ओबीसींना धक्का नको'

मराठा मोर्च्यांनी देशासमोर आदर्श ठेवला. मराठ्यांच्या मागणीचा सरकारने विचार करावा, पण ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये. मुळात सध्याचं सरकार सामान्य माणूस आणि शेतक•यांच्या हिताचा निर्णय घेत नाही. कोपर्डी घटना घडून 3 महिने उलटले तरी चार्जशीट दाखल झाली नाही म्हणून लोकांच्या मनात चीड आहे. हे दुखणं विस्थापितांच आहे त्यामुळे आरक्षणाची मागणी होत आहे. मराठ्यांच्या मोर्च्यात शेतकरी कर्ज माफीची मागणी होत आहे याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे अशी मागणीही पवारांनी केली.

'ही विदर्भवाद्यांची फसवणूक'

सत्तेवर येण्याच्या आधी भाजपने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. नितीन गडकरींनी तर लेखी आश्वासन दिले होते. आता सत्तेवर आल्यावर भाजप घूमजाव करत आहे. ही विदर्भवाद्यांची फसवणूक आहे. आता वेगळ्या विदर्भाचा निर्णय लोकांनी घ्यावा आम्ही लोकमतच्या विरोधात जाणार नाही असंही पवारांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 6, 2016 05:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close