S M L

पाक अधिकारी म्हणतो, हो सर, त्यादिवशी 12 जण ठार झाले !

Sachin Salve | Updated On: Oct 5, 2016 10:14 PM IST

पाक अधिकारी म्हणतो, हो सर, त्यादिवशी 12 जण ठार झाले !

 05 ऑक्टोबर : उरी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन भारतीय जवानांनी अतिरेक्यांचा खात्मा केला. पण पाकिस्ताननं भारतानं सर्जिकल स्ट्राईक केलंच नसल्याचा कांगावा सुरू केला. आता पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीरमधल्या मिरपूरचे पोलीस अधीक्षक गुलाम अकबर यांनी तोंडघशी पाडलंय. सिएनएन न्यूज 18 च्या रिपोर्टरने पोलीस महानिरीक्षक असल्याचं सांगून मिरपूरच्या एसपींना फोन केला. आणि त्यांच्याकडून शिताफींने सर्जिकल हल्ल्याबद्दल माहिती मिळवली. ते सर्व संभाषण रेकॉर्ड केलं. त्यात भारतानं सर्जिकल स्ट्राईक केल्याची कबुली अकबर यांनी केलीय. सर्जिकल स्ट्राईक कुठं झालं, त्यात किती अतिरेकी मारले गेले याचे तपशील त्यांनी दिलेत.

गुलाम अकबर यांच्याबरोबर सीएनएन न्यूज 18नं केलेली ही बातचीत 

सीएनएन न्यूज 18 - गुलाम, तुम्ही कसे आहात. आयजी मुश्ताक बोलतोय


मीरपूर एसपी - ईश्वराच्या आशीर्वादानं मी चांगला आहे.

सीएनएन न्यूज 18 - काय चाललंय तिकडे, तुमच्या भागाबद्दल खूप ऐकतोय

मीरपूर एसपी - हो सर, सीमेवर. सकाळपासून काही विशेष घडत नाहीये.

Loading...

सीएनएन न्यूज 18 - सर्जिकल स्ट्राईकबद्दल ते बोलत आहेत.

मीरपूर एसपी - सर ते 29 तारखेबद्दल बोलत आहेत.

सीएनएन न्यूज 18 - आपले केवळ तीनच जण ठार झालेत, असं लष्कर प्रशासन सांगत आहे. मात्र, त्यांचा दावा असा आहे की 30 ते 40 जण ठार झालेत.

मीरपूर एसपी - सर ते मोठा दावा करत आहेत. एवढी हानी झालेली नाही. मात्र, भारतानं सीमा पार केली होती.

सीएनएन न्यूज 18 - तुझ्या मते किती जण ठार झाले असतील?

मीरपूर एसपी - सर, माझ्या मते सर्जिकल हल्ल्यात 12 जण ठार झाले.

सीएनएन न्यूज 18 - एकाच कॅम्पवर हल्ला झाला का?

मीरपूर एसपी - एकाच छावणीवर हल्ला झाला नाही, पण फार कमी माहिती समोर येतेय. सीमेपर्यंतचा संपूर्ण भाग सील करण्यात आलाय.

मीरपूर एसपी - भिंबर जिल्ह्यातला लिपा, उस्मानी, समानी, अस्मानी इथल्या लष्कर ए तैयबाच्या तळावर हल्ला झाला

स्मीरपूर एसपी - हो सर, एकूण 12 जण ठार झाले

सीएनएन न्यूज 18 - त्या मृतदेहांचं दफन केलंय का?

मीरपूर एसपी - हो सर, 12 कॉफिन्स होत्या

सीएनएन न्यूज 18 - अच्छा, 12 कॉफिन्स होत्या

मीरपूर एसपी - सर ते वेगवेगळ्या भागातले होते. कॉफिन्स वेगवेगळ्या भागाकडे रवाना झाल्या

- सर्जिकल स्ट्राईक - नेमकं काय घडलं ?

- 28 सप्टेंबर 2016 - लढाऊ हेलिकॉप्टर्समधून पॅराकमांडोच्या 5 टीम पाकव्याप्त काश्मीरमध्ये

- 29 सप्टेंबर, पहाटे 2 वा. - पॅराकमांडोंंनी स्फोटकं, रॉकेट लाँचर्स आणि ग्रेनेड्ससह लाँचपॅड्स सज्ज केले

- या कमांडोंना संरक्षण देण्यासाठी भारताकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार

- पॅराकमांडोंचा दहशतवाद्यांच्या 7 तळांवर हल्ला, 50 दहशतवादी ठार

- पाकव्याप्त काश्मीरमध्ये भिंबर, हॉट स्प्रिंग, केल, लिपा या ठिकाणी सजिर्कल स्ट्राईक्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 5, 2016 10:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close