किरीट सोमय्या भूकणारा कुत्रा -अनिल परब

किरीट सोमय्या भूकणारा कुत्रा -अनिल परब

  • Share this:

parab_vs_somiyaमुंबई, 05 ऑक्टोबर : हत्ती चालत असतो कुत्रे भुंकत असतात. योग्य वेळी कुत्र्याच्या पेकाटात लाथ घालू, शिवसेना हा सुर्य आहे. किरीट सोमय्या सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हणत सेनेचे नेते अनिल परब यांनी किरीट सोमय्या म्हणजे भुंकणारा कुत्रा आहे अशी उपमाच देऊन टाकलीये.

मुंबई महानगरपालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आणि सत्तेत आल्यावर मुंबईतले सगळे माफिया अड्डे बंद करू, असं भाजप खासदार किरीट सोमय्या म्हणाले होते. त्यावर अनिल परब यांनी शेलक्या भाषेत टीका केली आहे. किरीट सोमय्या यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. ते बेताल वक्तव्ये करतायत. किरीट सोमय्या म्हणजे भुंकणारा कुत्रा असल्याचं अनिल परब म्हणाले. तसंच युतीचा निर्णय किरीट सोमय्या घेणार नाहीत. त्यामुळे ते काय बोलतात याचा आम्हाला फरक पडत नाही. महापालिकेतील भ्रष्टाचार किरीट सोमय्या यांना आताच का दिसला? महापालिकेत शिवसेना भाजप युतीची सत्ता आहे. ज्या प्रस्तावांवर शिवसेना सही करते त्याच प्रस्तावांवर भाजपदेखील सही करते हे त्यांनी लक्षात घ्यावे असा टोलाही परब यांनी लगावला.

तसंच पंकजा मुंडे, गिरीश बापट, विनोद तावडे, विष्णू सावरा यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते त्यांनी लावून धरावे. राज्यात आणि केंद्रात ज्यांना मंत्रिपदं मिळाली नाहीत ते सगळे मिळून मुख्यमंत्र्यांची खुर्ची डळमळीत करत आहेत. किरीट सोमय्या हे त्यापैकीच एक आहेत असा आरोपही परब यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2016 08:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading