औरंगाबाद : मोर्चेकरी शिक्षकांवर गुन्हे दाखल, शिक्षकांची काॅलेज बंदची हाक

औरंगाबाद : मोर्चेकरी शिक्षकांवर गुन्हे दाखल, शिक्षकांची काॅलेज बंदची हाक

  • Share this:

 abad_techer345

औरंगाबाद, 05 ऑक्टोबर : औरंगाबादमध्ये मोर्चे काढणाऱ्या शिक्षकांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्यानं शिक्षक संघटना आक्रमक झालीये. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर लावलेल्या कलमाच्या निषेधार्थ उद्या शिक्षक संघटनांनी औरंगाबादमधील शाळा आणि कॉलेज बंदची हाक दिलीये

औरंगाबादेत काल झालेल्या पोलीस आणि शिक्षकांच्या राड्याप्रकरणी पोलीसांनी जवळपास साठ शिक्षकांना अटक केली आहे. अटक झालेल्या शिक्षकांवर विनाकारण कलम लावल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केलाय. पोलिसांचा लाठीहल्ला आणि शिक्षकांची दगडफेक यामध्ये एका पोलिसांचा मृत्यू झाला. पोलिसाचा मृत्यू हार्ट अटॅकमुळं झाला त्यात शिक्षकांचा काहीच दोष नाही. आंदोलनकर्ते शिक्षकांवर पोलिसाच्या मृत्यूस कारणीभूत ठरवून 307 कलम लावला असा आरोप शिक्षक संघटनांनी केलाय. त्याचाच निषेध म्हणून उद्या राज्यातील सर्व शाळा कॉलेज बंद आंदोलनाची हाक शिक्षक संघनांनी दिली आहे. तसंच पोलिसांनी मोर्चा काढणाऱ्या 60 शिक्षकांवर गुन्हा दाखल केलाय. ही कारवाई सुडबुद्धीनं केल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: October 5, 2016, 7:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading