विजेच्या धक्क्यानं राज्यात 4,625 जणांचा मृत्यू

विजेच्या धक्क्यानं राज्यात 4,625 जणांचा मृत्यू

  • Share this:

mahavitran05 ऑक्टोबर : महावितरणच्या विजेचा शॉक लागून गेल्या साडेपाच वर्षांत राज्यात तब्बल 4 हजार 625 लोकांचा आणि 296 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

1 जानेवारी 2011 ते जुलै 2016 म्हणजेच गेल्या साडेपाच वर्षातील आरटीआय मध्येच महावितरणने ही माहिती दिली आहे. दरम्यान राज्यातील वीज वितरण कंपनीचे जवळपास 90 टक्के लाईनमन हे बोगस लाईनमन ठेवतात अशी कबुली ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. यापुढे असे बोगस लाईनमन ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलंय. चाळीस हजार रुपये पगार घेऊन हे लाईन मन आठ ते दहा हजारांवर बोगस लाईनमन ठेवतात असंही ऊर्जामंत्री म्हणाले.

महावितरणचा 'शॉक'

- विजेच्या धक्क्यानं राज्यात 4,625 जणांचा मृत्यू

- 1 जाने. 2011 ते जुलै 2016 पर्यंतची आकडेवारी

- 90 टक्के लाईनमन बोगस लाईनमन ठेवतात

- सेवेतल्या लाईनमनना 40 हजार रु. पगार

- सेवेतले लाईनमन बोगस लाईनमनना 8 ते 10 हजार पगार देतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2016 07:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading