खाते गोठवण्याच्या निर्णयामुळे बीसीसीआयला हादरा, न्यूझीलंड सीरिज रद्द करण्याची दिली धमकी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2016 12:21 PM IST

खाते गोठवण्याच्या निर्णयामुळे बीसीसीआयला हादरा, न्यूझीलंड सीरिज रद्द करण्याची दिली धमकी

bcci_anurag04 ऑक्टोबर : जस्टिस लोढा समितीवर पहिल्यांदाच बीसीसीआयने कडक भूमिका घेतलीये. बीसीसीआयचे खाते गोठवणाचा निर्णय घेणाऱ्या लोढा समितीच्या शिफारशीनंतर न्यूझीलंड दौरा धोक्यात आलाय. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी न्यूझीलंड सीरिज रद्द करण्याचा सुतोवाच केलाय.

सुप्रीम कोर्टाचे आदेश धुडकावून स्थानिक क्रिकेट संघटनांना अनुदान वाटप केल्यामुळे सुप्रीम कोर्टाची नाराजी बीसीसीआयनं ओढावलीय. आता ह्या अनुदानाचे पैसे ज्या बँकांमध्ये होते, त्या बँकांनी बीसीससीआयची खातीच गोठवल्याचं समजतंय. आयपीएल आणि चॅम्पियन ट्रॉफी पैकी एकच स्पर्धा खेळवली जाईल. लोढा समितीच्या अनेक शिफारसींचा खेळावर परिणाम होतोय असं बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचं म्हणणंय.

तर बीसीसीआयच्या रोजच्या खर्चावर कोणतीही मर्यादा घालण्यात आली नाही. खेळाडूंचं मानधन आणि मॅचेसवर होणाऱ्या खर्चावर बंदी घालण्यात आली नाही असं जस्टिस लोढा समितीने स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे, कालच लोढा समितीने बीसीसीआयचे खाते गोठवण्याचे निर्देश दिले होते. बीसीसीआय आमच्या शिफारशीचं पालन करत नाही असा दावा समितीने केला होता. तसंच आम्ही पाठवलेला मेल नीट वाचावा असंही समितीने स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2016 12:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...