News18 Lokmat

सैन्यात कुणी जायला सांगितलं होतं ? -ओम पुरी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2016 11:22 AM IST

सैन्यात कुणी जायला सांगितलं होतं ? -ओम पुरी

04 ऑक्टोबर : देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची बाजी लावणार जवान जेव्हा शहीद होतो तेव्हा अवघा देश दु:ख व्यक्त करतो. पण, बॉलिवूडच्या चकाचक दुनियेत वाढलेल्या अभिनेत्यांना यांचं भान नसल्याची शर्मेची बाब समोर आलीये. सैन्यामध्ये भरती होण्यासाठी कुणी सांगितलं होतं. सैन्यात जायला आम्ही काय दबाव टाकला होता असं असंवेदनशील वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी केलंय.

आयबीएन 7 च्या 'हम तो पुछेंगे' या विशेष कार्यक्रमात ओम पुरी सहभागी झाले होते. तेव्हा भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी देशभरातून वेगवेगळे सल्ले का दिले जात आहे ? का पाकिस्तानी कलाकारांची पाठराखण केली जात आहे ? असा सवाल केला असता, सरकारने पाक कलाकारांचा व्हिसा रद्द केला पाहिजे अशी मागणी ओम पुरींनी केली.

मात्र, त्यानंतर तावातावाने बोलणारे ओम पुरींनी शहीद जवानांवर असंवेदनशील वक्तव्य केलं. "देशामध्ये 15 ते 20 असे लोक आहे. ज्यांना बॉम्ब लावून पाकमध्ये पाठवता येईल. आपल्या तरुणांना सैन्यामध्ये भरती होण्याची कुणी जबरदस्ती केली होती. सैन्यामध्ये जाण्यासाठी कुणी सांगितलं होतं."

ओम पुरी एवढ्यावर थांबले नाही. भारत, पाकिस्तान आणि इस्त्राईलला फिलिस्तानने बनवलंय असा जावाईशोधही लावला. पुढे ते म्हणाले, देशातील मुस्लिम समाजाला भडकावू नये. भारताची फाळणी ही फक्त देशाची फाळणी नव्हती तर दोन परिवारांची फाळणी होती. देशातील अनेकांचे नातेवाईक पाकमध्ये राहतात, मग कसं युद्ध करायचं ? असा सवालच पुरींनी विचारला.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 4, 2016 09:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...