चंदू चव्हाण यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू - पर्रीकर

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2016 04:40 PM IST

parrikar

02 ऑक्टोबर :  'चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांना परत आणण्यासाठी लष्करी कारवायांचे उच्च पातळीवर प्रयत्न करत आहेत. चुकून सीमारेषा ओलांडणाऱ्या जवानांना परत मायदेशी आणण्यासाठी विशिष्ट कार्यपद्धती असते. त्यानुसार चव्हाण यांच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,' अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली आहे.

पुणे इथे आयोजित भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या कार्यक्रमात बोलताना पर्रीकरांनी ही माहिती दिली.

'चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानाच्या हद्दीत गेलेल्या जवानांना परत पाठवण्यासाठी एक विशिष्ट पद्धत (स्टॅण्डर्ड मेकॅनिझम) पूर्वीपासूनच आहे. चंदू चव्हाण यानेही चुकून सीमा0रेषा ओलांडली आहे. त्याला परत आणण्यासाठी याच पद्धतीचा वापर करून प्रयत्न सुरू आहेत. सध्या डीजीएमओ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत,' असे पर्रीकर यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, राज्याचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी धुळ्यातील जवान चंदु चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. चंदू 30 तारखेला अचानक पाकिस्तानच्या हद्दीत गेल्यामुळे त्याला पाकिस्तानी सैन्याने अटक केलीय. चंदूला पाकमधून परत आणण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्यासोबतच गावकर्‍यांनाही सरकारवर विश्वास ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. यावेळी चंदूला परत भारतात आणण्यासाठी सरकारने नक्की काय काय प्रयत्न केलेत याची माहितीही भामरे यांनी चंदूच्या कुटुंबियांना दिली.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2016 04:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...