दुष्काळात तळ गाठलेलं उजनी धरण 100 टक्के भरलं

दुष्काळात तळ गाठलेलं उजनी धरण 100 टक्के भरलं

  • Share this:

ujani23301 ऑक्टोबर : पुणे , सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतक•ऱ्यांना वरदान ठरलेली उजनी धरण मागील दुष्काळात वजा 53 टक्क्यांवर गेली होती. त्यामुळे उजनीच्या पाण्यावर आधारीत आसणारा शेतकरी मोठ्या अडचणीत आला होता. आता मात्र परतीच्या पावसाने उजनी धरण शंभर टक्के भरले आहे.

या वर्षी पडलेल्या दुष्काळाने उजनीच्या पाण्याने तळ गाठला होता. त्यामुळे या पाण्यावर आधारीत असणा•ऱ्या शेती बरोबर पिण्याच्या पाण्याच्या योजना सुद्धा बंद पडल्या होत्य़ा. शेतीच्या सिंचनाचा वीजपुरवठा आठ तासांवरुन पाच तासांवर आणला होता. त्यामुळे शेती व्यवसाय आणि पाणी पुरवठा योजना मोठ्या प्रमाणात धोक्यात आल्या होत्या. आता मात्र राज्यात होत असलेल्या परतीच्या पावसाने उजनी धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: October 1, 2016, 8:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading