News18 Lokmat

लातूरमध्ये पावसाचा हाहाकार, मन्याड नदीच्या पुरात नागरिक अडकले

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2016 06:36 PM IST

latur_rainलातूर, 01 ऑक्टोबर : मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. लातूरमध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मन्याड रेणा नदीच्या काठावरील गावात पाणी शिरलंय. मावलगाव शिवारात सुमारे 15 ते 20 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहे.

पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं राज्य शासनाकडे हेलिकॉप्टरची आणि एनडीआरएफ टीमची मागणी केली असून शासनाची एनडीआरएफ टीम आणि हेलिकॉप्टर अहमदपूर तालुक्यातील मावलगावकडे रवाना झाली आहे. गावापासून दोन किमी अंतरावर शेतात राहणारे हे लोक आहेत. शेताजवळ दोन्ही बाजूने रेणा आणि मन्याड नदीचं पात्र जवळच असल्यानं पाणी पूर्ण शिवारात आल्यानं हे लोक अडकले आहेत.

दरम्यान, उस्मानाबादसह नांदेडमध्ये मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे या पावसाचा फटका पिकांना बसणार आहे. लातूरच्या अहमदपूर तालुक्यात जोरात पाऊस झाल्याने लिंबोटी धरणाचे 15 दरवाजे उघडण्यात आले आहेत. अचानक पाण्याची आवक वाढल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उस्मानाबाद मधील 8 ही तालुक्यात पावसाची संततधार सुरुच आहे. सगळ्यात जास्त पाऊस कळंब तालुक्यात पडतोय तर भूम तालुुक्यात आधीच्या तुलनेत कमी पाऊस पडतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 1, 2016 06:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...