S M L

सलमानबद्दल देशाची जनता ठरवले -सलीम खान

Sachin Salve | Updated On: Oct 1, 2016 01:48 PM IST

सलमानबद्दल देशाची जनता ठरवले -सलीम खान

01 ऑक्टोबर : सलमान खाननं पाकिस्तान कलाकरांची पाठराखण केल्यामुळे चांगलाच अडचणीत सापडला आहे. नेहमीप्रमाणे सलमानचे वडील सलीम खान सारवासारव करत असता. मात्र, यावेळी त्यांनी देशाची जनता काय ते ठरवेल असं सांगत हात झटकले आहे.

सलमान खान नेहमी याना त्या वादामुळे अडचणीत सापडतो. आताही देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट असताना पाक कलाकारांची पाठराखण करुन सर्वांचा रोष ओढावून घेतला आहे. यावर सलमान खानचे वडील सलीम खान यांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास आधी नकार दिलाय. दर वेळी सलमाननं केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सलिम खानना निस्तराव लागतं मात्र यावेळी त्यांनी बोलण्यास नकार दिला. आमच्या प्रतिनिधी शिवांगी ठाकूर हीने त्यांना प्रश्न विचारला असा त्यांनी पहिले तर काहीचं बोलले नाही नंतर मात्र देश की जनता ठरवले असं बोलून तेथून निघून गेले. प्रत्येक वेळी सलमानच्या वादावर पडदा टाकणारे वडील सलीम खान यांनी यावेळी सलमानचा फैसला जनतेवर सोपवलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो कराबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 1, 2016 01:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close