सर्जिकल स्ट्राईक काय असते भारताला दाखवून देऊ, हाफीजने ओकली गरळ

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2016 09:37 PM IST

hafiz saied30 सप्टेंबर : पाकव्याप्त काश्मीरमधल्या सर्जिकल स्टाईक केल्यामुळे दहशतवाद्यांना चांगलीच मिर्ची झोंबली आहे. सर्जिकल कारवाई काय असते हे मोदींच्या कृपेने आम्ही भारताला दाखवून देऊ अशी गरळ लष्कर ए तोयबाचा म्होरक्या मोहम्मद हाफीज सईद याने ओकलीये.

जमात उद दवा या संघटनेनं लाहोरमध्ये रॅली काढली होती. ही संघटना लष्कर ए तोयबा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचाच भाग आहे. लष्कर ए तोयबाचा म्होरक्या मोहम्मद हाफीज सईद हाही या रॅलीमध्ये सहभागी झाला होता. नवाज शरीफ यांनी सैन्याला मुक्तहस्ते परवानगी द्यावी आणि भारतात घुसून भारतीय सैन्याला काश्मीरमधून बाहेर काढावे अशी दर्पोक्ती सईद याने केली. इतकंच नाही तर आता सर्जिकल कारवाई काय असते हे मोदींच्या कृपेने आम्ही भारताला दाखवून देऊ अशी गरळही त्यानं ओकलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2016 09:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...