सर्जिकल हल्ल्यानंतर शेअर मार्केट कोसळलं

सर्जिकल हल्ल्यानंतर शेअर मार्केट कोसळलं

  • Share this:

610172-stock-market

29 सप्टेंबर :  पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय जवानांनी दहशतवादी तळांवर हल्ले केल्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. हल्ले केल्याचं लष्करानं जाहीर करताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 555 अंकांनी कोसळला असून निफ्टी 170 अंकांनी घसरला आहे.

उरी हल्ल्यानंतर इशारे देऊनही सीमेपलीकडून घुसखोरीचे प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला भारतानं बुधवारी रात्री दणका दिला. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतानं कारवाई केली. याबाबत पत्रकार परिषद घेऊन लष्करी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर तात्काळ दिसला. मुंबई शेअर बाजाराचा सेनेक्स 555 अंकांनी कोसळला. तर, निफ्टी १70 अंकांनी. रुपयाचे मूल्यही घसरले असून रुपया डॉलरमागे ६६.८२ रुपये झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: September 29, 2016, 3:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading