पवारांच्या बारामतीत आज मराठा मोर्चाचा एल्गार

पवारांच्या बारामतीत आज मराठा मोर्चाचा एल्गार

  • Share this:

293704-maratha-arakshan

29 सप्टेंबर :  मराठा क्रांती मोर्चा आज शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीत धडकणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मोर्चाला किती गर्दी होणार याकडे लक्ष लागेल आहे. सकाळी 11 वाजता कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या मोर्चाला सुरुवात होईल.पुण्यातल्या मोर्चाप्रमाणेच बारामतीतील मराठा मोर्चाही विक्रमी ठरण्याची चिन्हं आहेत.

कोपर्डीत प्रकरणातल्या दोषींना फाशी द्या, मराठ्यांना आरक्षण द्या, आणि अॅट्रोसिटी कायद्यात सुधारणा करा, या मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत. विशेषम म्हणजे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील सदस्य या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे. मोर्चा शिस्तबद्ध व्हावा यासाठी 2500 स्वयंसेवक तैनात करण्यात आले असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला धनगर समाजानं पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे. मराठा समाजाच्या मागण्या अगदी रास्त आहेत. मराठा समाज उत्सफुर्त बाहेर पडलाय. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही आग्रही आहोत त्याच प्रमाणे मराठा समाज देखील मागासलेला असल्याने त्यांना देखील आरक्षण मिळणे आवश्यक असल्यानं आम्ही धनगर समाजाच्या वतीने मराठा आरक्षणास पाठिंबा देत असुन उद्या बारामतीतील मोर्चात धनगर समाज सामील होणार आहे असे धनगर समाज आरक्षण कृती समीतीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी बोलताना सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: September 29, 2016, 9:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading