World Cup : रविंद्र जडेजा का बसतो नेहमी कोहलीच्या बाजूला, हार्दिक पांड्यानं केली पोलखोल

World Cup : रविंद्र जडेजा का बसतो नेहमी कोहलीच्या बाजूला, हार्दिक पांड्यानं केली पोलखोल

भारत आणि न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे सावट, पण विराटसेना किंवींची शिकार करण्यास सज्ज.

  • Share this:

ट्रेंट ब्रिज, 13 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघ आज न्यूझीलंडच्या संघाशी दोन हात करणार आहे. याआधी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आता विराटसेना विजयी हॅट्रीक साधण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. तो म्हणजे ऑस्ट्रेलियाविरोधात शतकी खेळी करणारा सलामीवीर शिख धवनच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळं त्याला या सामन्याला मुकावे लागणार आहे. तब्बल तीन आठवडे शिखर धवन भारतासाठी खेळू शकणार नाही, त्यामुळं भारतासाठी केएल राहुल सलामीसाठी येऊ शकतो. दरम्यान एकीकडे पावसामुळं चिंतेत असलेला भारतीय संघ सध्या ड्रेसिंगमध्ये आराम करातान दिसत आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बीसीसीआयनं अपलोड केलेल्या या व्हिडीओमध्ये भारताचा अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्यानं चाहत्यांना भारतीय संघाची ड्रेसिंग रुम तर दाखवलीच त्याचबरोबर भारतीय संघातील खेळाडूंची पोलखोलही केली. या व्हिडिओमध्ये हार्दिकनं ड्रेसिंग रुममध्ये कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, केदार जाधव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह हे खेळाडू कुठे बसतात, तसेच काय-काय करतात हे ही सांगितले.

विराटच्या शेजारी नेहमी असतो सर रवींद्र जडेजा

हार्दिकनं या व्हिडिओमध्या सर रवींद्र जडेजा काय करतो हे ही सांगितले. ते नेहमी कर्णधाराच्या बाजूची जागा पकडतो. तसेच, सुंपर्ण संघात जेवढी जागा कोणाकडे नाही तेवढी जागा कर्णधार कोहलीकडं आहे, हे ही हार्दिकनं सांगितले.

आजच्या सामन्यावर पावसाचं सावट

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिज येथे सामना होणार आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात पाऊस होत आहे. पावसामुळं भारताला सरावही करता आला नाही. जर हा सामना झाला नाही तर, दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात येतील. मात्र चाहत्यांची पुरती निराशा होणार आहे.

सराव सामन्यात किवी पडले होते भारतावर भारी

वर्ल्ड कप सामने सुरु होण्याआधी भारतानं न्यूझीलंविरोधात एक सामना खेळला होता. मात्र या सामन्यात न्यूझीलंडचा संघ भारतावर भारी पडला होता. भारताचा संपुर्ण संघ 179 धावांवर बाद झाला होता. हा सामना भारताला गमवावा लागला होता. त्यामुळं सराव सामन्याचा बदला भारताला आज घ्यावा लागणार आहे.

SPECIAL REPROT : भारत करणार का किवींची शिकार? पण 'हे' विसरून चालणार नाही!

First published: June 13, 2019, 1:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading