एेकावं ते नवलंच, चक्क वाॅशेबल नोटा !

Sachin Salve | Updated On: Sep 25, 2016 04:39 PM IST

एेकावं ते नवलंच, चक्क वाॅशेबल नोटा !

25 सप्टेंबर : नोटा पाण्यात भिजू नये म्हणून खास काळजी घेतो पण जर तुम्हाला वॉशेबल नोटा मिळाल्या तर...दचकू नका हो हे खरं आहे. बँक ऑफ इंग्लंडने प्लॉस्टिकच्या नोटा बाजारात आणणार आहे. या नोटा पाण्यात जरी भिजल्या तरी त्यांना काहीही होणार नाही.

पैसै खातात हे वाक्य आपण भारतात कायम वापरतो. मात्र बँक ऑफ इंग्लंडने हे वाक्य अमलात आणलंय. प्लॉस्टिक पॉलिमरच्या नोटा इंग्लडमध्ये वापरात आणल्या आहेत. जगात पहिल्यांदाच प्लॉस्टिक नोटा वापरात येणार आहे. आठवड्यापूर्वी बँक ऑफ इग्ंलडने या नोटांचा डेमो पत्रकारांपुढे सादर केला. या नोटांचं वैशिष्ट म्हणजे या नोटा कुठल्याही परिस्थितीत चुरगळू शकत नाही. या नोटा वॉशेबल आहे. या नोटांचं आयुष्य कागदापासून तयार झालेल्या नोटेपेक्षा जास्त असेल. मुख्य म्हणजे चूकून तुम्ही या नोट्या खाल्या तरी त्या डायजेस्टेबल आहेत. गेल्या 320 वर्षांपासून इंग्लडमध्ये कागदाच्या नोटा वापरात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2016 04:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close