आरक्षण आणि अॅट्रॉसिटीबाबत चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवाव - उदयनराजे

आरक्षण आणि अॅट्रॉसिटीबाबत चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवाव - उदयनराजे

  • Share this:

Udayan raje bhosll213

24 सप्टेंबर – मराठा मोर्चे हे कोणत्याही जातीच्या विरोधात नाही. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आणि ॲट्रॉसिटी कायद्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी सरकारनं विषेश अधिवेशन बोलवावं अशी मागणी खासदार उदयनराजे यांनी केली आहे.

मराठा मूक मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी नाशिकमध्ये हजेरी लावली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.

मराठ्यांनी मूकमोर्चे काढले आहेत. परिस्थिति बिघडली तर उद्रेक होईल. लीबिया, सीरिया सारखी परिस्थिति होऊ देऊ नका. पक्षपेक्षा देशाचा विचार करा, असा सल्ला त्यांनी दिला. ॲट्रॉसिटी कायदा कालबाह्य झाला आहे. त्यामुळे सामाजिक समतोल टिकायचा असेल तर कायद्यात बदल करा, अशी मागणी यावेळी उदयनराजेंनी केली. या मागणीकडं दुर्लक्ष केल्यास त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील असा इशाराही उदयनराजेंनी दिला आहे.

मराठा ही जात नाही जगण्याची संस्कृती                      

मराठा ही जात नाही जीवन जगण्याची संस्कृती आहे. स्पर्धेच्या युगात फक्त मेरिट हाच निकष असला पाहिजे. मराठा सोडून सर्वांना आरक्षण देतात. कुठल्याही जातीचा असो, आर्थिकदृष्टया गरीब असेल त्याला आरक्षण द्या. स्पर्धेच्या युगात आरक्षणामुळे प्रगती खुंटली आहे, असं उदयनराजे म्हणाले. जाती-जातींचे मोर्चे निघताय, पण ही काय स्पर्धा लागली आहे का?, असा सवाल त्यांनी केला. आरक्षण असल्याने भारतातले संशोधक अमेरिकेत गेले.  राज्यकर्त्यांनी जाती तयार केल्या.नेते अभिनेत्यांपेक्षा जास्त चांगला अभिनय करतात. सर्वाधिक कर्जांची परतफेड शेतकरी करतात, उद्योगपती कर्ज बुडवतात, अशा अनेक विषयांना उदयनराजेंनी हात घातला.

कोपर्डी बलात्कारी नराधमांना गोळ्या घाला! 

कोपर्डी बलात्कार आणि हत्या करणाऱ्या नराधमांना चांगला धडा शिकवायला हवा. कोपर्डीत घडलेली बलात्काराची घटना ही छत्रपती शिवाजी महारांच्या स्वराज्याला काळीमा फासणारी घटना असून त्या नराधमांना जाहीर फाशी द्या, त्यांना लोकांसमोरच गोळ्या घालून ठार मारा, असं ते म्हणालेत. या मूक मोर्चाच्या माध्यमातून सरकारला ते 'कोपर्डी बलात्कारातील गुन्हेगारांना फाशी द्या', अशा प्रकारे जनतेचा आक्रोश ऐकायला मिळत आहे. त्यामुळे त्वरीत न्याय देणे हेच देशाच्या हिताचं आहे. लोकांचा सरकार आणि पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे, असंही उदयनराजे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: September 24, 2016, 7:15 PM IST

ताज्या बातम्या