अमेरिकेच्या एका मॉलमध्ये अंधाधुद गोळीबार, 4 ठार

अमेरिकेच्या एका मॉलमध्ये अंधाधुद गोळीबार, 4 ठार

  • Share this:

CtGna3nUEAEGzKn

23 सप्टेंबर – अमेरिकेतील बर्लिंग्टनच्या एका मॉलमध्ये एका अज्ञाताने अंधाधुद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार जण ठार झाले असून, यात तीन महिलांचा समावेश आहे. ही दुर्देवी घटना कास्केड मॉलमध्ये आज घडली आहे.

हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यानंतर संपूर्ण रिकामा करण्यात आला असून, गोळीबार करणारा अज्ञात अजूनही मॉलमध्ये आहे का? याची तपास घेण्यात येत आहे. पोलीस अधिकारी सार्जेंट मार्क फ्रांसिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ग्रे कपडे परिधान केलेले आहे. तो हिस्पॅनिक समुदायाचा असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

गे कपडे परिधान केलेल्या व्यक्तीला मॉलमध्ये जाताना पाहिले होते. बहुधा त्यानेच गोळीबार केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर पोलिसांनी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. मात्र, हल्लेखोर किती आहेत, याबाबत अद्यात माहिती मिळू शकली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: September 24, 2016, 1:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading