वसई तुंबली, जनजीवन विस्कळीत

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2016 04:23 PM IST

वसई तुंबली, जनजीवन विस्कळीत

vasai_rainवसई, 22 सप्टेंबर : वसई तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय. मागील 24 तासांत 115 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विरार पूर्व भाताने पाण्याखाली गेल्याने आजूबाजूच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भाताने, जाभुळपाडा, नवसई, तळ्याचापाडा, हत्तीपाडा, काजूपाडा, आडने यासह आजूबाजूच्या गाव आहेत. सध्या पावसाने उसंत घेतली असून पाण्याची पातळी हळूहळू कमी होत आहे.

वसई पर्वेकडील सखल भाग पाण्याखाली गेला आहे. एव्हरशाईन रस्ता, मिठागर वस्ती पूर्ण पाण्याखाली गेली आहे. वसईहुन महामार्गाकडे जाणा•या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. रात्री विरार पूर्व फुलपाडा धरण ओव्हरफोल झाल्याने पुर्वेकडील मानवेल पाडा रस्ता, फुलपाडा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. तर नालासोपारा परिसरातील तुळींज रोड, सेंट्रल पार्क रोड, आचोळे रोडवरही पाणीच पाणी झाले आहे. पावसाने असाच जोर कायम ठेवला तर तालुक्यातील मोठ्याप्रमाणात जनजीवन आणखी विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

मिठागर वस्ती पाण्याखाली

काल रात्रभर झालेल्या पावसाने वसईच्या मिठागराच्या वस्तीत पाणी शिरले आहे. या वस्तीत जवळपास 125 कुटुंब राहत असून 400 लोक घरात अडकून पडले आहेत. कमरे इतके पाणी त्यांच्या वस्तीत आहेत. विशेष म्हणजे अनेक लोक लाईटच्या टॉवरवर चढून बसले आहेत. तर अनेक जन सकाळीच घर सोडून बाहे गेले आहेत.

आज महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवनांनी बोटीच्या साह्याने आत शिरून जवळपास 25 जणांची सुटका केली. दरवर्षी या लोकांची हीच परिस्थती असते. या परिसरात पाणी शिरल्या मुळे या भागाचा वीज पुरवठा देखील खंडित केला आहे. विशेष म्हणजे मतांचा जोगवा मागणारे एक ही राजकारणी या भागाकडे फिरकले देखील नाही. जर पावसाचा जोर वाढला तर याच्या परिसरात आणखी पाणी शिरण्याची शक्यता आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2016 01:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...