दिवाळीआधी मराठा मोर्च्याची मुंबईत सांगता, मुख्यमंत्र्यांना विचारणार 3 प्रश्न !

दिवाळीआधी मराठा मोर्च्याची मुंबईत सांगता, मुख्यमंत्र्यांना विचारणार 3 प्रश्न !

  • Share this:

maratha_marorchaमुंबई, 21 सप्टेंबर : मराठा आरक्षण आणि ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात लाखोंच्या संख्येनं मराठा क्रांती मोर्चे निघत आहे. राज्यभर मूक मोर्चे निघाल्यानंतर या मोर्च्याची सांगता राजधानी मुंबईत दिवाळीआधी होणार आहे. या मोर्च्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सामोरं जावं अशी मागणी मोर्चेकरांची आहे. या मोर्च्याच्या आयोजनासाठी राज्यातील सर्व आयोजक एकवटले आहे.

मुंबईत मराठा मोर्चाचे आयोजन करण्यासाठी महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीचे मुंबईच्या मोर्चाचे आयोजन कसं आणि कधी करायचं याबाबत चर्चा करण्यात आली. राज्यातले सर्व जिल्ह्यात ज्या ज्या व्यक्तींनी मोर्चाचे नियोजन केलं त्या सर्वांची एकत्र येणार आहे. त्यात मुंबईच्या मोर्चाची तारीख ठरेल, पण मोर्चा दिवाळीच्या आधी घेण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र आणि मुंबईतील 50 लाख मराठा एकत्र येतील असा अंदाज आयोजकांनी यावेळी व्यक्त केलाय. आमच्या वतीने कोणीही चर्चा करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या मोर्चाला समोर यावं, सर्वासमोर आमच्या 3 प्रश्नांची समाधानकारक उत्तर द्यावं अन्यथा मुंबईतून हलणार नाही असा इशाराही आयोजकांनी दिला. पण 3 प्रश्न कोणते हे मात्र आयोजकांनी सांगितलं. या बैठकीला कर्नल सुधीर सावंत, भाई जगताप, ज्ञानेश महाराव, भारत पाटणकर, यांच्यासह कल्याण, डोंबिवली, ठाणे , मुंबईतील अनेक मराठा समाजाच्या संघटना आणि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: September 21, 2016, 9:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading