'अक्कलपाडा'चं पाणी पेटलं,पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

'अक्कलपाडा'चं पाणी पेटलं,पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

  • Share this:

dhule_akalpada धुळे, 20 सप्टेंबर : जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणाचे पाणी चांगलेच पेटले आहे. अक्कलपाडा धरणातील पाणी डाव्या कालव्यातून सोडावे अशी मागणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचे उद्रेक झाल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी एक वाजेच्या सुमारास दगडफ़ेक केली.

धुळे तालुक्यात प्रचंड दुष्काळाची स्थिती असल्याने अक्कलपाडा धरणातील पाणी लवकर सोडण्यात यावे अशी मागणी खंडलाय, शिरडाणे , नवलाने , कावठी, मेहरगाव , निमडाळे , वार , गोंदूर , सूटरेपाडा या गावांतील शेतकऱ्यांची होती. उजव्या कालव्यातून पाणी सोडले जात असताना डाव्या कालव्याचे थोडे काम पूर्ण करून पाणी का सोडले जात नाही असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थिती केला होता.

तब्बल तीन तास जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन करूनही अधिकारी चर्चा करायला तयार नसल्याने दगडफेकीची घटना घडली. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे हे सुरवातीला आंदोलन स्थळी येऊन गाडीतून न उतरता निघून गेल्याने शेतकरी चिडले होते , नंतर काही आंदोलकांशी चर्च करण्यात आली मात्र आश्वासनापलीकडे काही मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर चाल केली. संतप्त शेतकऱ्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

काय आहे अक्कलपाडा धरणाचा पाणी प्रश्न ?

- अक्कलपाडा धरण धुळे साक्री तालुक्याच्या सीमेवर

- प्रशासकीय मान्यता 30 जानेवारी 1984

- 206 कोटी किंमतीचे धरण

- धरणाचं सातत्यानं रखडलं

- 90 टक्के धरणाचं काम पूर्ण

- धरणात पाणी अडवायला सुरुवात झालीये.

- उजवा कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झालीय.

- डाव्या कालव्याचं काम अपूर्ण

- 16 गावातल्या शेतकर्‍यांची डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

- गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2016 04:10 PM IST

ताज्या बातम्या