तुम्हीच हस्तक्षेप करा, शरीफ यांची अमेरिकेकडे धाव

तुम्हीच हस्तक्षेप करा, शरीफ यांची अमेरिकेकडे धाव

  • Share this:

20 सप्टेंबर : काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारतानं पाकिस्तानला सर्वस्व जबाबदार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर या संदर्भात पाकिस्तानकडून उलट्या बोंबा सुरू झाल्या आहेत. कारण याविषयात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेनं हस्तक्षेप करावं यासाठी अमेरिकेकडे धाव घेतली आहे.

sharif_meet_careyरविवारी उरी इथं लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 18 जवान शहीद झाले. आतापर्यंतच्या हल्ल्यात सर्वाधिक जवान या हल्ल्यात शहीद झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेऊन पाकला धडा शिकवण्याची रणनीती आखली आहे. उरी हल्ल्यामागे पाकिस्तानच असल्याचं भारताने स्पष्ट संकेत दिले आहे. या हल्ल्याचे आंतराष्ट्रीय स्तरावरही पडसाद उमटले आहे. जपान आणि रशियाने पाकिस्तान विरोधी भूमिका घेतली आहे.

त्यामुळे आपला बचाव करण्यासाठी पाकिस्तानने आता अमेरिकेकडे धाव घेतलीये. सोमवारी शरीफ यांनी न्यूयॉर्क येथे अमेरिकेचे विदेश मंत्री जॉन यांची भेट घेतली. काश्मीरमध्ये भारत कशा पद्धतीने मानव अधिकारीचे उल्लंघन करत आहे अशा खोट्या व्यथा शरीफ यांनी केरी यांच्या समोर मांडल्या. तसंच भारत-पाक संबधात अमेरिकनं हस्तक्षेप करावं अशी यावेळी शरीफ यांनी मागणी केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: September 20, 2016, 9:30 AM IST

ताज्या बातम्या