20 सप्टेंबर : उरी हल्ल्यामध्ये शहीद 3 जवानांच्या पाथिर्वावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.शहीद चंद्रकांत गलंडे यांचं पार्थिव सातार्याहून त्यांच्या मुळगावी जाशीला रवाना झाला आहे.
तर अमरावतीचे शहीद जवान विकास उईके आणि यवतमाळचे विकास कुळमेथे यांचं पार्थिव आज नागपूरहून सकाळी 10 वाजता त्यांच्या मुळगावी रवाना होणार आहे. शहीद विकास उईके यांच्यावर अमरावतील नांदाखडेश्वर या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार होणार आहे.
शहीद कुळमेथे यांच्यावर यवतमाळमधील पुरड या त्यांच्या मुळगावी अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. रविवारी उरी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या नाशिकच्या संदीप ठोक यांच्या पार्थिवावर काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद ठोक यांच्या मुळगावी खंडागळी इथं शेवटच्या निरोप देण्यात आला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv