शहीद संदीप ठोक अनंतात विलीन

शहीद संदीप ठोक अनंतात विलीन

  • Share this:

sdfsdनाशिक, 19 सप्टेंबर : उरी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या 3 जवानांचं पाथिर्व महाराष्ट्रात आणण्यात आलं. नाशिकच्या शहीद संदीप ठोक यांचं पार्थिव त्यांच्या मुळगावी खडांगळी इथं पाठवण्यात आलं. तिथं त्यांच्या पार्थिवाचं अत्यदर्शन झाल्यानंतर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आहे.

शहिद संदीप ठोक यांच्या पार्थिवाला जवानांनी सलामी दिली. संदीप ठोक यांना अखेरचा निरोप देण्यासाठी खंडगळीचे गावकरी आणि नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थिती होते. 'अमर रहे हे' च्या घोषणांनी वातावरण भावूक झाले. शोकाकुल वातावरणात खडांगळीच्या सुपुत्राला साश्रुनयनाने अखेरचा निरोप देण्यात आला.

दरम्यान, हवामान खराब असल्यानं विकास उईके यांचं पार्थिव उद्या नागपूरला रवाना होणार आहे. सध्या त्यांचं पार्थिव पुण्यात ठेवण्यात आलंय. तर सातार्‍याचे शहीद जवान चंद्रकांत गलांडे यांचं पार्थिव सातार्‍याला रवाना करण्यात आलंय. यवतमाळचे विकास कुळमेथे यांचाही उपचारा दरम्यान मृत्यू ओढवलाय. त्यांचं पाथिर्व नंतर महाराष्ट्रात आणलं जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2016 11:35 PM IST

ताज्या बातम्या