घरी पाठवलेले पैसे, शेवटची मदत ठरली !

घरी पाठवलेले पैसे, शेवटची मदत ठरली !

  • Share this:

vikas_uikeअमरावती, 19 सप्टेंबर : उरी इथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यात अमरावतीचा सुपुत्र पंजाब उर्फ विकास जानराव उईके या जवानाला वीरमरण आलंय. ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातला रहिवाशी होते. या दुःखद बातमीनंतर अमरावती जिल्ह्यात एकच शोककळा पसरली आहे. आज वीर जवान पंजाब उर्फ विकास यांचं पार्थिव शरीर त्यांच्या राहत्या घरी आणण्यात येणार आहे. घरखर्चासाठी विकास यांनी काही दिवसांपूर्वी पैसे पाठवले होते.

26 वर्षाचा शाहिद पंजाब उर्फ विकास उईके हा 2009 मध्ये 6 बिहार बटालियनमध्ये दाखल झाले होते. सैन्यात दाखल झाल्यानंतर आसाम ,वेस्ट बंगाल आणि नंतर जम्मूच्या उरी सेक्टरच्या सीमा रक्षणाला होते. काल जेव्हा उरी सेक्टरवर भ्याड दहशतवादी हल्ला झाला होत्या त्यात पंजाब उर्फ विकास उईके हे गंभीररित्या जखमी झाले होते.

ही बातमी कळताच विकास यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला तर महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जातेय. गावाचा लाडका आणि महाराष्ट्राचा सुपुत्र यांच्या देहदर्शनासाठी संपूर्ण गाव एकत्र झालंय. अनेकांचे डोळे यावेळी पाणावले होते. देशप्रेम हे शहिद विकास यांच्या रक्तातच होतं. त्यांचे वडील जानराव उईके यांनी सुद्धा आपले 23 वर्षं देशसेवेत अर्पण केले होते. काही दिवसांपूर्वी विकास यांनी घरी पैसेही पाठवले होते. त्यांचीही मदत शेवटची ठरली. त्यांच्या मागे आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2016 02:47 PM IST

ताज्या बातम्या