आता दिवा फास्ट !, 'मरे'वर उद्या 10 तासांच जम्बो ब्लॉक

  • Share this:

jumbo-block17 सप्टेंबर : मध्य रेल्वे मार्गावर उद्या दिवा इथल्या कट-कनेक्शनच्या कामासाठी दहा तासांचा पहिला महा-मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दिवा स्थानकात जलद लोकलना थांबा देण्यासाठी रविवारी सकाळी 8.30 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत हा महा-मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

या ब्लॉक दरम्यान कल्याणकडे जाणार्‍या धीम्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामळे कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली

स्थानकांवरील प्रवाशांचे हाल होणार आहेत. सकाळी 8.30 ते सकाळी 9.30 आणि संध्याकाळी 5.30 ते 7 या दरम्यान डाऊन धीमा मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे. तर सकाळी 9.30 ते 5.30 या काळात डाऊन धीम्या लोकल दिवा स्थानकापासून डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. सकाळी 8 ते 9.30 वाजता आणि संध्याकाळी 5.30 ते 7 या काळात कळवा आणि मुंब्रा स्थानकांमध्ये कल्याणच्या दिशेने जाणार्‍या धीम्या लोकल बंद राहणार आहेत. या कामासाठी एकूण 4 ब्लॉक घेण्यात येणार असून पुढील ब्लॉक 15 दिवसानंतर घेण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2016 04:39 PM IST

ताज्या बातम्या