Elec-widget

मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा

17 एप्रिल21व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा मुंबईत नुकतीच करण्यात आली. यात नाट्य आणि सिनेमा क्षेत्रातल्या भरीव कामगिरीसाठी अभिनेता मोहन जोशी यांना, संगीतक्षेत्रासाठी गायक हरिहरन, उत्कृष्ठ नाट्य निर्मितीसाठी प्रशांत दामले, शास्त्रीय संगीतासाठी पंडीत शिवानंद पाटील यांची, तर समाजसेवेसाठी नसिमा हुरजुक यांची निवड करण्यात आली आहे.साहित्यासाठीचा वाग्विलासिनी पुरस्कार मधु मंगेश कर्णिक आणि यांना देण्यात येणार आहे, तर कवियत्री शांताबाई शेळके पुरस्कार कवी वसंत आबाजी डहाके यांना देण्यात येणार आहे. तसेच विशेष पुरस्कारासाठी अभिनेत्री काजोलची निवड झाली आहे. लता मंगेशकर यांच्या हस्ते 24 एप्रिलला या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2010 06:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...