विद्या बालनाला डेंग्यूची लागण

  • Share this:

vidya-630-july-1516 सप्टेंबर : बॉलिवूडची अभिनेत्री विद्या बालनाला डेंग्यूची लागण झाल्याची बाबसमोर आली आहे.  विद्यावर तिच्या राहत्या घरीच उपचार सुरू असून 10 दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.

विद्या बालन सध्या कहानी 2 चित्रपटात व्यस्त आहे. अमेरिकेहुन चित्रपटाचं शुटिंग करून मुंबईत परतल्यानंतर विद्याला अस्वस्थ वाटू लागले.  डॉक्टरांनी तपासणी केली असता विद्याला डेंगूची लागण झाल्याचं निदान झालं. विद्यावर राहत्या घरीच उपचार सुरू आहे.

महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनीही विद्याच्या घराची पाहणी केली. त्यावेळी तिच्या इमारतीच्या गच्चीवर डेंग्यूच्या अळ्ळ्या सापडल्या. पण, त्या नष्ट केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केलाय. तर अभिनेता शाहिद कपूरही याच इमारतीत राहतो. शाहिदच्या घराच्या स्विमिंग पूलमध्ये डेंग्यूच्या अळ्ळ्या सापडून आल्या आहे. पालिकेचे आरोग्य अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.  2012 साली प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांचं डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: September 16, 2016, 6:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading