वीरेंद्र तावडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

वीरेंद्र तावडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

  • Share this:

virendra_tawade16 सप्टेंबर : कॉ.गोविंद पानसरे हत्येप्रकरणातील दुसरा संशयित आरोपी सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडेला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्याची पोलीस कोठडी संपल्यावर त्याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं.

गेल्या 14 दिवसांमध्ये तावडेनं तपासाबाबत काहीच सहकार्य केलं नाही त्यानं वेळेचा अपव्यय केला असं पोलिसांनी न्यायालयात

सांगितलंय. दरम्यान, तावडेला सीबीआयची कोठडी असल्यामुळे त्याला कोल्हापूरच्या जेलमध्ये न ठेवता पुण्याच्या येरवडा कारागृहात हलवण्यात येणार आहे. त्यामुळे एकीकडे तपास गतीमान होत आहे असं चित्र असतानाच आता तावडेची पोलीस कोठडी संपल्यामुळे एसआयटीचा तपास कशा पद्धतीनं होणार याकडं आता सगळ्याचं लक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: September 16, 2016, 5:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading