सावरा म्हणतात, 'ते' वाक्य माझ्या तोंडी घातलं गेलं !

सावरा म्हणतात, 'ते' वाक्य माझ्या तोंडी घातलं गेलं !

  • Share this:

मुंबई, 16 सप्टेंबर : कुपोषणाबद्दलच्या अत्यंत संतापजनक वक्तव्यानंतर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी आपल्या वक्तव्याचं खापर मीडियावरच फोडलंय. मी असं बोललोच नव्हतो,माझ्या तोंडी हे वाक्य घालण्यात आलं अशी सारवासारव वजा आरोपच सावरा यांनी केली.vishanu_savara

केंद्रात वादग्रस्त मंत्र्यांमुळे नरेंद्र मोदी चांगलेच अडचणीत आले होते. आता याचीच पुर्नावृृती राज्यात होते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. पालघर सारख्या कुपोषण भागातून निवडून आलेले विष्णू सावरा आदिवासी विकास मंत्रिपदी विराजमान झाले. पण मंत्रिपदाचा हा डामडोलारा सांभळला जात नाही की काय असं बेजाबदार व्यक्तव्य विष्णू सावरा यांनी केलं. विशेष म्हणजे सावरा हे जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहे. 600 मुलं मेली तर असू दे की असं वक्तव्यच विष्णू सावरा यांनी केलं होतं. असं बोलून सुद्धा विष्णू सावरा यांनी सारवासारव केली खरी पण आपल्या तोंडी असं वाक्य घालण्यात आलं आणि हा माझा आरोप आहे असं म्हणण्यास सावरा विसरले नाही.

पालघरमधील कळमपाडा भागात सागर वाघ नावाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. वाघ कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी तिथे काही राजकीय नेते आणि श्रमजीवी संघटना हजर होत्या. त्यांनी मला घरात येण्यास आडकाठी केली. वाघ कुटुंबातील एकाही सदस्याने मला घरात येण्यास मनाई केली नव्हती. मला तिथे जाण्यास उशीर जरी झाला असला तरी त्या कुटुंबियांची मी भेट घेऊ नये का ? भेट घेऊन सरकारकडून काही मदत देता येईल का हा माझा प्रयत्न होता. पण, माझ्याविरुद्ध तिथल्या लोकांना भडकावण्यात आलं, असू दे की हे जरी मी म्हटलो असलो तरी ते वाक्य माझ्या तोंडी घातलं गेलं असा आरोपच सावरांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2016 05:09 PM IST

ताज्या बातम्या