विष्णू सावरांच्या मतदारसंघात कुपोषणाचा आणखी एक बळी

विष्णू सावरांच्या मतदारसंघात कुपोषणाचा आणखी एक बळी

  • Share this:

vishnu_savara3316 सप्टेंबर : 600 मुलं मेली तर असू दे की असं म्हणणार्‍या आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या मतदारसंघात कुपोषणाचा आणखी एक बळी गेलाय. पालघरच्या पेठ रांजणीत एका चिमुरडीचा कुपोषणाने मृत्यू झालाय. 2 महिन्यातला मोखाड्यातला कुपोषणाचा हा 18 वा बळी आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये कुपोषणामुळे होणार्‍या बळींची संख्या वाढल्यामुळे अनेक आदिवासी बालकांना आपला जीव गमवावा लागलाय. पालघर जिल्ह्यातील कुपोषणाच्या प्रश्नात आता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी जातीनं लक्ष घातलंय. जव्हार, मोखाडा या भागातील बालकांना कुपोषणाच्या समस्येतून सोडविण्यासाठी आरोग्य, महिला आणि बालकल्याण आणि आदिवासी विकास या तिन्ही विभागांच्या समन्वयातून वॉर फुटिंगवर प्रयत्न करावेत, असे निर्देशच राज्यपालांनी दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: September 16, 2016, 4:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading