येत्या 48 तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2016 02:13 PM IST

येत्या 48 तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

rains in maha

16 सप्टेंबर : येत्या 48 तासांत राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस जवळपास सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झाला आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या या इशार्‍याकडे लक्ष लागलं आहे.

गणपती विसर्जना दरम्यानही राज्यातील अनेक भागांत दमदार पावसाने हजेरी लावली होती. मुंबईसह उपनगरातही सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. शहरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 39.84 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर पश्चिम उपनगरांत 37.93 मिमी पाऊस झाला असून पूर्व उपनगरात 36.37 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

याशिवाय, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली. मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातं विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील शेवाडी गावात ढगफुटी झाली आहे. जिल्ह्यात तब्बल 221 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हवामान खात्याच्या नव्या इशार्‍यानुसार कोकण-गोवा पट्‌ट्यात येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातही येत्या 24 तासांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2016 10:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...