बिबट्यांना मारल्याची कबुली

बिबट्यांना मारल्याची कबुली

17 एप्रिलमाहुरच्या जंगलात काही दिवसांपूर्वी 3 बिबट्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या बिबट्यांचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट करण्यात आला. यामध्ये त्यांना विषप्रयोग करुन मारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. माहुरच्या जंगलामध्ये तस्करी करणारी टोळी कार्यरत होती. या लोकांना बिबट्यांची भिती निर्माण झाली होती. त्यांना तस्करीसाठी अडचण येत होती. म्हणून या लोकांनी बिबट्यांवर विषप्रयोग केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या तीन बिबट्यांना मारल्याप्रकरणी एका आरोपीला माहूर पोलिसांनी अटक केली. या आरोपींनेही बिबट्याला मारल्याची कबुली दिली आहे.सातार्‍यात बिबट्या जेरबंदसातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाठारवाडी, गामेवाडी भागात गेल्या सहा महिन्यांपासून धुमाकूळ घालणार्‍या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले. आतापर्यंत या बिबट्याने दोन शेतकर्‍यांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते.गेल्या सहा महिन्यांपासून या भागात बिबट्याचा वावर होता. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतात जाणेही अवघड झाले होते. या बिबट्याने पाळीव प्राण्यांना पळवण्याचा सपाटा लावला होता. याबद्दल अनेकदा गावकर्‍यांनी वनविभागाकडे तक्रार केली होती. पण त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत होते. शेवटी वनविभागाने पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद केले. नंतर या बिबट्याला चांदोली अभयारण्यात सोडून देण्यात आले.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2010 03:01 PM IST

ताज्या बातम्या