गणेश विसर्जन : मुंबई-पुण्यात या मार्गावर प्रवास टाळा !

गणेश विसर्जन : मुंबई-पुण्यात या मार्गावर प्रवास टाळा !

  • Share this:

mumbai_pune_visarjan14 सप्टेंबर : उद्या अनंत चतुर्दशी...गेल्या 10 दिवसांपासून मुक्कामी असलेले लाडके बाप्पा आता आपल्या गावाला निघणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्वच जण सज्ज झाले आहे. खास करून मुंबई,पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये बाप्पाच्या विसर्जनासाठी संपूर्ण तयारी झाली आहे. उद्या हा लाडका बाप्पा वाजतगाजत सर्वांचा निरोप घेणार आहे. या निरोप प्रसंगी कोणतेही विघ्न घडू नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.

अशी आहे मुंबईत व्यवस्था

मुंबई पोलीस आणि पालिका सज्ज झाली आहे. गणेश विसर्जनासाठी 27 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. सोबतच गिरगाव, दादर, वरळी माहीम, जुहू या सारख्या किनार्‍यांवर सुद्धा संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनाच्या सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलिसांनी ठोस बंदोबस्त केला आहे. मुंबई पोलिसांची सुट्टी ही रद्द करण्यात आली आहे. क्राइम ब्रांचचे पोलिसही साध्या वेशात फिरणार आहेत. विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेराची नजर असेल.

मुंबई : गणेश विसर्जन

- 49 रस्ते वाहतुकीसाठी पूर्ण बंद

- 55 रस्ते वन वे

- 18 रस्त्यांवर अवजड वाहतूक बंद

- 99 रस्त्यांवर नो पार्किंग

हे मार्ग बंद

- जे. एस. एस. रोड

- सी. पी. टँक रोड, काळबादेवी

- जगन्नाथ शंकरशेठ रोड, गिरगाव

- एस.व्ही.पी. रोड, गिरगाव

- डॉ. बी.ए. आंबेडकर रोड, परेल

- न.चिं. केळकर रोड, दादर

- रानडे रोड, दादर

- एलबीएस रोड, कुर्ला आणि मुलुंड

- लिंकिंग रोड

- जुहू तारा रोड

- आरे कॉलनी रोड

पुणेकर सज्ज

तर गणेश विसर्जन मिरवणूक सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलीस सज्ज झाले आहेत. मिरवणुकीसाठी एकूण 9 हजार पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या 4 कंपन्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग आणि विसर्जन घाट या ठिकाणी 118 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा वॉच राहणार आहे. विसर्जन मिरवणुकीच्या काळात एकूण 17 रस्ते बंद राहणार आहेत. दरम्यान, पुणे शहरात 17 विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नदीत विसर्जनासाठी उद्या सकाळी 8.00 वाजता खडकवासला धरणातून 2000 क्युसेकने पाणी मुठा नदीत सोडण्यात येणार आहे. क्षेत्रीय कार्यालयातील अधिकार्‍यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

पुणेकरांनो हे मार्ग टाळा

1. लक्ष्मी रस्ता - डुल्या मारुती चौक, सतरंजीवाला चौक, बेलबाग चौक, गणपती चौक, कुंटे चौक, उंबर्‍या गणपती, विजय टॉकीज, अलका चौक

2. केळकर मार्ग - भिवजीबाबा चौक, सकाळ प्रेस, प्रभात सिनेमा, रमणबाग न्यू इंग्लिश स्कूल, अलका चौक

3. कुमठेकर मार्ग - शनिपार चौक, फडतरे चौक, सदाशिव हौद चौक, चित्रशाळा चौक, जोंधळे चौक

4. टिळक मार्ग - जेथे चौक, हिराबाग चौक, एसपी कॉलेज, टिळक स्मारक, साहित्य परिषद चौक, अलका चौक

नागपुरात तयारी पूर्ण

गेल्या दहा दिवसांपासून आपल्या सोबत विराजमान असलेल्या बाप्पाला उद्या निरोप देण्यात येणार आहे.आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी नागपूर पोलीस आणि पालिका सज्ज झाली आहे. तर अनेक घरगुती बाप्पांना आजच निरोप देण्यात येताय. त्यातच गणेश विसर्जन मिरवणूक सुरक्षित आणि शांततेत पार पाडण्यासाठी हजारोंच्या संख्येनं नागपूर पोलीस सज्ज झाले आहेत.

नाशिक पोलीस आणि पालिका सज्ज

लाडक्या गणारायाला निरोप देण्यासाठी नाशिक महानगर पालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे शहरतील अनेक ठिकाणाच्या नदी तसंच तलावात गणेशच विसर्जन केलं जाणार आहे. गोदावरी नदीकाठा जवळ महानगर पालिकेनं नदी प्रदूषण रोखावं म्हणून कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे. तर पोलिसांनी देखील खबरदारी म्हणून शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे.दरम्यान, मागील वर्षी तर महाराष्ट्रत सर्वाधिक नाशिक मधील नागरिकांनी मूर्ति दान केल्या होत्या. त्यामुळे याही वर्षी हा उपक्रम राबवला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2016 11:07 PM IST

ताज्या बातम्या