रिओ पॅरालिम्पिक : भालाफेकमध्ये देवेंद्र झाझरियानं पटकावलं 'सुवर्णपदक'

रिओ पॅरालिम्पिक : भालाफेकमध्ये देवेंद्र झाझरियानं पटकावलं 'सुवर्णपदक'

  • Share this:

Devendra Jhajharia

14 सप्टेंबर :  रियो पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळालं आहे. भालाफेकपटू देवेंद्र झाझरियानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.

पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक F46 इव्हेंटमध्ये देवेंद्र झांझरियाने सुवर्णवेध घेतला. वयाच्या आठव्या वर्षी झाडावर चढताना झालेल्या अपघातात देवेंद्रला डावा हात गमवावा लागला होता. परंतु, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यानं भालाफेकीत घवघवीत यश मिळवलं आहे. आज 36 वर्षांचा देवेंद्र भालाफेकपटूंच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रिओमधील त्याच्या सोनेरी कामगिरीमुळे भारताच्या खात्यात आता दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी चार पदकं जमा झाली आहेत.

विशेष म्हणजे देवेंदनं 2004 च्या अथेन्स पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदकाची कमाई केली होती. 2008 आणि 2012च्या पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये भालाफेक या क्रीडाप्रकाराचा समावेश नव्हता. त्यामुळे तब्बल 12 वर्षांनंतर देवेंद्रने केलेल्या या 'सोनेरी' कामगिरीबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

देवेंद्र झाझरियाला 2004 मध्ये अर्जुन पुरस्काराने तर 2012 मध्ये पद्मश्रीने गौरवलं आहे. हा सन्मान पटकावणारा तो पहिला पॅरालिम्पिकपटू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2016 09:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading