S M L

पोलिसाची मुजोरी, आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधीशी धक्काबुक्की

Sachin Salve | Updated On: Sep 12, 2016 02:31 PM IST

पोलिसाची मुजोरी, आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधीशी धक्काबुक्की

मुंबई, 12 सप्टेंबर : एकीकडे पोलिसांवर वाढत्या हल्ल्यांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे पण दुसरीकडे पोलिसांची मुजोरीही समोर आलीये. लालबागच्या राजाच्या मंडपात पोलीस अधिकार्‍याने आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी उदय जाधव यांना धक्काबुक्की केलीये. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

लालबागच्या राजाच्या मंडपात वादग्रस्त घटनांचं प्रमाण खूप वाढलंय. आमचे प्रतिनिधी उदय जाधव हे लालबागच्या राजाचं वार्तांकन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी एसीपी अजय पाटणकर यांनी त्यांना धक्काबुक्की केली. उदय जाधव यांच्याकडे लालबागच्या राजाच्या

मीडिया बॉक्समध्ये जाण्यासाठी आयडीकार्ड होते. ते मीडिया बॉक्सकडे जात असतांना त्यांना हटकण्यात आलंय.


उदय जाधव यांनी एसीपी अजय पाटणकर यांना भेटून आपल्याकडे आयडी कार्ड असल्याचं दाखवलं. आयडी असूनही मला आता का सोडलं जात नाही, असं विचारलं असता एसीपी अजय पाटणकर यांनी उदय जाधव यांना थेट ढकलून दिलं. हा सर्व प्रकार कॅमेर्‍यात कैद झाला. या प्रकारानंतर लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर कॅमेर्‍यासमोर मात्र पाटणकर यांनी नमती भूमिका घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 12, 2016 02:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close