किवीविरुद्ध मायदेशी 'विराट सेना' लढणार,रोहितलाही संधी

किवीविरुद्ध मायदेशी 'विराट सेना' लढणार,रोहितलाही संधी

  • Share this:

virat_ajinkay12 सप्टेंबर : न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीये. टीममध्ये कोणतेही नवे बदल करण्यात आले नसून वेस्ट इंडिज दौर्‍यासाटी जी टीम होती तीच टीम न्यूझीलंडविरु द्ध मैदानात उतरणार आहे. विराट कोहली कर्णधार तर अजिंक्य रहाणे उपकर्णधार असणार आहे. रोहित शर्माला संधी देण्यात आलीये. तर शार्दुल ठाकूर आणि स्टुअर्ट बिन्नीला टीममधून वगळण्यात आलंय. गौतम गंभीरला पुन्हा एकदा टीममध्ये जागा मिळू शकली नाही. हरभजन सिंग आणि युवराज सिंगलाही संधी मिळाली नाही.

टीम इंडियाने नुकतंच वेस्ट इंडिजमधील कसोटी मालिकेत 2-0 असा विजय मिऴवला होता. विराट कोहलीच्या टीमला आता मायदेशात येत्या सहा महिन्यांत 13 कसोटी सामने खेळायचे आहेत. भारताच्या या परिक्षेची सुरूवात 22 सप्टेंबरला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेने होणार आहे. तीन कसोटी आणि पाच एकदिवशी सामन्याची ही मालिका असणार आहे. कसोटी मालिका ही 22 ते 12 ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर पाच एकदिवशी मालिका ही 16 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

अशी आहे टीम

विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, रोहित शर्मा, आर. आश्विन, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, मोहम्मद सामी, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा आणि उमेश यादव

कसोटीचं वेळापत्रक

पहिली कसोटी - 22 ते 26 सप्टेंबर, ग्रीन पार्क कानपूर

दुसरी कसोटी - 30 सप्टेंबर ते 4 आक्टोबर, ईडन गार्डन, कोलकाता

तिसरी कसोटी - 8 ते 12 आक्टोबर, होल्कर स्टेडिअम, इंदौर

एकदिवसीय वेळापत्रक

पहिली वनडे - 16 ऑक्टोबर,एचपीसीए स्टेडिअम, धर्मशाला

दुसरी वनडे - 19 ऑक्टोबर, फिरोजशहा कोटला, दिल्ली

तिसरी वनडे - 23 ऑक्टोबर, पीसीए स्टेडिअम, मोहाली

चौथा वनडे - 26 ऑक्टोबर, जेएससीए इंडरनॅशनल स्टेडिअम, रांची

पाचवा वनडे - 29 ऑक्टोबर, विशाखपट्टनम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2016 01:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading