S M L

लालबागच्या राजाच्या दरबारात पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Samruddha Bhambure | Updated On: Sep 11, 2016 07:26 PM IST

लालबागच्या राजाच्या दरबारात पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

11 सप्टेंबर :   'लालबागचा राजा' गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आपल्या ओळखीच्या व्यक्तींना बाप्पाच्या दर्शनासाठी आत सोडणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना ऑनड्युटी पीएसआय दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यालाच धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काल, शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. पण याप्रकरणी अद्याप मंडळाच्या कार्यकर्त्यांविरोधात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

'लालबागचा राजा'च्या दर्शनाला आपल्या ओळखीची माणसे सोडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांवर मंडळाचे कार्यकर्ते दादागिरी करताना दिसून आलेत. मुखदर्शनाच्या रांगेत ओळखीच्या माणसांना सोडण्यास कार्यकर्ते सांगत होते. त्याचवेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने त्या कार्यकर्त्यांना बाजुला केलं. यावरून कार्यकर्त्यांनी पोलिसांशी वाद घातला. त्यानंतर त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.


काही दिवसांपूर्वी 'लालबागचा राजा'च्या कार्यकर्त्याने पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता. पण तो मंडळाचा कार्यकर्ता नसल्याचे सांगत 'लालबागचा राजा' मंडळाने ते प्रकरण मिटवलं. थोडक्यात नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाच्या दरबारात सर्वच काही आलबेल चित्रं नसल्याचच स्पष्ट होतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2016 07:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close