S M L

आता थोडं जपून, पवारांचा शिंदेंना सल्ला

Sachin Salve | Updated On: Sep 4, 2016 09:10 PM IST

 आता थोडं जपून, पवारांचा शिंदेंना सल्ला

04 सप्टेंबर : सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्या दरम्यान 'सुशीलजी आता थोडं जपून'असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. सुशीलकुमार शिंदेंचा खडतर प्रवासाच्या आठवणी सांगताना त्यांना मिळालेल्या संधीविषयी बोलताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी कसं दुर्लक्ष केलं हेही यावेळी पवारांनी सांगितलं.

माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा  सोलापूरात पार पडला. त्यांच्या या अमृतमहोत्सवानिमित्त अवघं राजकीय क्षेत्रचं सोलापुरात अवतरलं होतं. यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यपाल सी.विद्यासागर राव आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य नेते या सोहळ्याला हजर आहेत..अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थितीत या सोहळ्यात पाहायला मिळाली. यावेळी बोलताना सुशीलकुमारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदेचा खडतर प्रवासाच्या आठवणी सांगताना त्यांना मिळालेल्या संधीविषयी बोलताना काँग्रेस पक्षश्‌्ा्रेष्ठींनी कसं दुर्लक्ष केलं हेही यावेळी पवारांनी सांगितलं. तर दारिद्राकडून प्रगतीकडचा प्रवास तरुणांना कसा आदर्श आहे हे सांगितलं आणि आता थोडं जपून असा सल्ला दिला. तसंच देशाचे सुशीलकुमार शिंदे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, राजकारणात यश संपादन केलं. शिंदे हे स्वकर्तृत्व आणि स्वकष्टाने उभे राहिलेले नेतृत्व आहे. त्यांचे नेतृत्व म्हणजे देशातील नव्या पिढीसमोर एक आदर्श आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा गौरव केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2016 09:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close