फडणवीसांचे 'संकटमोचक' अडचणीत, चार सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची शक्यता!

फडणवीसांचे 'संकटमोचक' अडचणीत, चार सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची शक्यता!

'सिंचन प्रकल्पांमध्ये एक रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला नाही. सरकारने हवी ती चौकशी करावी मात्र कामं थांबवू नयेत.'

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 05 डिसेंबर : सत्ता जाताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाजन हे जलसंपदामंत्री असताना सरकारच्या शेवटच्या काळात जे जलसिंचन प्रकल्प मंजूर झाले त्यांचा नवं सरकार आढावा घेण्याची शक्यता आहे. हे सर्व चार प्रकल्प जळगाव जिल्ह्यातले आहेत. त्यासाठी 5 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र हा निर्णय घेताना नियमांचं पालन करण्यात आलेलं नाही अशी माहिती दिली जातेय. उद्धव ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे महाजन अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला गिरीश महाजन यांनी आव्हान दिलंय.गिरीश महाजन म्हणाले, सिंचन प्रकल्पांमध्ये एक रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला नाही. सरकारने हवी ती चौकशी करावी मात्र कामं थांबवू नयेत असंही त्यांनी सांगितलं.

'राष्ट्रवादीशी युती कधीच होऊ शकत नाही'; नेत्याचे थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान

सत्तेत आल्यानंर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारच्या प्रकल्पांचा आढावा घ्यायला सुरुवात केलीय. कुठलेही प्रकल्प थांबविण्यात येणार नाहीत मात्र अनावश्यक खर्च थांबविणार असल्याचं ठाकरे यांनी म्हटलंय. तर सर्व प्रकल्पांचा आढावा घेऊन अग्रक्रम ठरविण्यात येणार असल्याचंही सरकारने म्हटलं आहे. या प्रकल्पांसाठी नुसताच 5 हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र त्या प्रस्तावांना अर्थमंत्रालयाची परवानगीच नव्हती असंही म्हटलं जातंय.

फडणवीसांच्या जवळच्या नेत्यांना दणका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकापाठोपाठ एक निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. यात आता भाजप नेत्यांच्या साखार कारखान्यांबाबतचा मोठा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री विनय कोरे आणि सोलापूर जिल्ह्य़ातील नेते कल्याण काळे या नेत्यांच्या साखर कारखान्यांना बँक हमी व खेळत्या भांडवलापोटी 310 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. तो निर्णय आता मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी घेतला.

इथं चक्क पाण्यावर तरंगतो 'राम' लिहिलेला दगड, Video व्हायरल

निवडणुकीआधी फडणवीस सरकारने अनेक निर्णय घेतले होते. त्यात पंकजा मुंडे यांच्या वैजनाथ सहकारी साखर कारखान्याला 50 कोटी, धनंजय महाडिक यांचा भीमा साखर कारखान्यास 85 कोटी, विनय कोरे यांचा तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्यास 100 कोटी व काँग्रेसमधून भाजपत गेलेले कल्याणराव काळे यांचा सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना यांच्या कारखान्याला 75 कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. सरकारच्या हमीमुळे कारखान्यांना कर्ज मिळणं सोपं झालं होतं.

First published: December 5, 2019, 5:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading