राज्याच्या प्रगतीत उत्तर भारतीयांचं मोठे योगदान - मुख्यमंत्री

  • Share this:

 devendra_fadanvis_nagpur_pc

मुंबई, 2 सप्टेंबर :  उत्तर भारत आणि महाराष्ट्राचे जुने नाते आहे. उत्तर भारतीय बांधवांनी मुंबई आणि महाराष्ट्राची संस्कृती समृद्ध केली आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत उत्तर भारतीय बांधवांचे मोठे योगदान आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय.

गोरेगाव येथे आयोजित 'मुख्यमंत्री से संवाद -लिट्टी चोखा के साथ' या कार्यक्रमात ते बोलत होते.  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईमध्ये देशातील विविध राज्यांचे नागरिक एकात्मतेने राहतात. या पुढे देखील भाषा, प्रांतवाद विसरुन देशाच्या प्रगतीत योगदान देऊया. तर उत्तर भारतीय मुंबईत आणि महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहेत. या शहराच्या आणि राज्याच्या सर्व क्षेत्रांत विकासाची वाटचाल सुरू असून, त्यात या समाजाची महत्वाची भूमिका आहे असं मत विद्या ठाकूर यांनी व्यक्त केलं.  या कार्यक्रमाला महिला आणि बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, खासदार गोपाळ शेट्टी, प्रतापगडचे खासदार हरिवंशसिंह, आमदार आशिष शेलार, शायना एन. सी., जयप्रकाश ठाकूर आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2016 11:12 PM IST

ताज्या बातम्या