News18 Lokmat

निवासी डॉक्टरांकडे अक्षम्य दुर्लक्ष, हायकोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2016 05:59 PM IST

mumbai high court434मुंबई, 02 सप्टेंबर : निवासी डॉक्टरांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था तर पुरवली जात तर नाहीच पण त्यांना मिळणारं मानधन आणि राहण्याच्या सोयीसुविधांकडे राज्य सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केलं असल्याचे ताशेरे मुंबई हायकोर्टाने ओढले आहेत. न्यायमुर्ती विद्यासागर कानडे आणि स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठापुढे डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्यावर असलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान हे ताशेरे ओढले.

मार्डचे डॉक्टर हे 24 तास कार्यरत असतात पण त्या मानाने त्यांना मिळणारं मानधन हे तुटपुंजं आहे असं मत हायकोर्टाने नोंदवलं. तसंच

डॉक्टर्स ज्या हॉस्टेल्समध्ये राहतात तिथली परिस्थितीही खराब असल्याबद्दलही कोर्टाने नाराजी व्यक्त केली. नुकतीच मुंबईत पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचा ड्युटीवर असताना मारहाण झाल्यानं मृत्यू झाला होता.

त्याचा संदर्भ देत कोर्टाने पोलीस आणि डॉक्टर्स हे समाजाची सेवा करत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणं ही सरकारची जबाबदारी आहे असं मतही कोर्टाने नोंदवलं. निवासी डॉक्टर्स राहत असलेल्या वसतीगृहांमध्ये परिस्थिती खराब असते. त्याबद्दल तीन आठवड्यात अहवाल सादर करावा असा आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 2, 2016 05:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...