जळगाव घरकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश जैन यांना जामीन मंजूर

जळगाव घरकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश जैन यांना जामीन मंजूर

  • Share this:

429252-sureshdada-jain

02 सप्टेंबर :  गेल्या  चार वर्षांपासून तुरुंगात असलेले माजी गृहनिर्माण राज्यमंत्री आणि घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन यांना  सुप्रीम कोर्टाने आज (शुक्रवारी) अखेर जामीन मंजूर केला. त्यामुळं त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

जळगावातील 29 कोटींच्या घरकुल घोटाळ्या प्रकरणी सुरेश जैन यांना 10 मार्च 2012 रोजी अटक करण्यात आली होती...मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना जे जे रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र नंतर पुन्हा त्यांची रवानगी तुरूंगात करण्यात आली.

दरम्यान, अनेकदा जामीनासाठी अर्ज करूनही त्यांना जामीन मिळत नव्हता. अखेर आज त्यांना जामीन मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: September 2, 2016, 2:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading