...हंडी फोडलीच नाही, तर मनुष्यवधाचा गुन्हा कसा - राज

  • Share this:

raj thakre

28 ऑगस्ट :  मुंबईत दहीहंडीचा उत्सव साजरा करताना गोविंदा पथकांनी कोर्टाने दिलेल्या 20 फुटावर दहीहंडी फोडण्याच्या आदेशाचे उल्लंघन केलं नसल्याचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. गोविंदा पथकाने 9 थर रचले असले तरी,  9 थर रचून हंडी फोडली नसल्यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा कसा, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

18 वर्षांखालील गोविंदांचा सहभाग आणि 20 फुटांवरील मानवी मनोरे यावर घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या दहीहंडी मंडळांच्या विरोधात ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह 16 गोविंदा पथकांचे प्रमुख अडचणीत येण्याची शक्यता आहे. खटले दाखल झालेल्या या सर्व पथकांची राज ठाकरेंनी ठाण्यात जाऊन भेट घेतली. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरील प्रश्नांना आपल्या स्टाइलने उत्तरं दिली.

तसंच यावेळी त्यांनी जीएसटी विधेयक मान्य असलं तरी त्यामध्ये केंद्राच्या हस्तक्षेपाला विरोध असल्याचंही स्पष्ट केले. लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालेले जीएसटी विधेयक अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. या विधेयकाला मनसे विरोध करणार असल्याचे संकेतही यावेळी राज ठाकरे यांनी दिले. विधेयकाला पाठिंबा असला तरी, या विधेयकानुसार वसूल केला जाणारा कर हा केंद्राने का वसूल करावा, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

जीएसटी विधेयकातील कर वसूल प्रणालीचा मार्ग चुकीचा असून प्रत्येक गोष्टीला केंद्राकडे जावं लागेल असं सांगत त्यांनी अधिवेशनात सर्व राजकीय पक्षानी या प्रणालीतील त्रूटीचा विरोध करावा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 28, 2016, 9:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading