डॉक्टर की कसाई ?, भुलीचे इंजेक्शन देऊन केली 6 जणांची हत्या

डॉक्टर की कसाई ?, भुलीचे इंजेक्शन देऊन केली 6 जणांची हत्या

  • Share this:

santosh_polवाई, 16 ऑगस्ट : मंगल जेधे खून प्रकरणी आता नवनवीन खुलासे समोर येत आहे. डॉ. संतोष पोळ यानं भुलीचे इंजेक्शनचे ओव्हरडोस देऊन सहा खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आलीये. मंगल जेधे हिनं दुसर्‍या आणि तिसर्‍या खून प्रकरणात मदत केल्याची माहिती संतोष पोळनं पोलिसांना दिलीये. खून केलेल्या पाच जणांचे सांगाडे पोलिसांना संतोष पोळच्या फार्म हाऊसच्या परिसरात पुरलेल्या अवस्थेत सापडले आहे. तर एक मृतदेह त्यानं आठ वर्षांपूर्वी धोम धरणात फेकून दिला होता. तो मृतदेह वाहून गेल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीये.

संतोष पोळनं सगळे खून भुलीचे ओव्हरडोस देऊन केल्याचं उघड झालंय. दुसर्‍या आणि तिसर्‍या खुनात मंगल जेधेनं पोळला मदत केली होती. आतापर्यंत पाच सांगाडे सापडले तर सहावा धोम धरणात आठ वर्षांपूर्वी टाकण्यात आला. त्यामुळे तो सापडणं शक्य नाहीये. आरोपीचा सोन्याची बिस्कीटं आणि नकली नोटांची तस्करी करणार्‍या टोळीसोबत होते संबंध सातार्‍यातल्या मंगल जेधे खून प्रकरणी तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आलीये. मंगल जेधेचा खून केल्याची कबुली डॉ. संतोष पोळ यानं दिलीये. इतकंच नाही तर आपण आतापर्यंत 6 खून केल्याचंही त्यानं पोलीस तपासात मान्य केलंय. त्यामध्ये 5 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या सर्व हत्या पोळने आपल्या फार्म हाऊसवर बोलावून केल्याचंही कबूल केलं आहे.

या संतोष पोळची पार्श्वभूमी काय ?

- इलेक्ट्रो होमिओपॅथी मेडिसीन ही पदवी घेतल्याचा दावा

- वाईतील घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये मदतनीस म्हणून नोकरी

- अनेक सरकारी अधिकार्‍यांवर ट्रॅप लावण्यासाठी एसीबीला मदत

डॉक्टर की कसाई?

- मंगल जेधे खून प्रकरण वाईमध्ये घडलं

- 16 जूनपासून मंगल जेधे बेपत्ता

- खून झाल्याचं 12 ऑगस्टला उघडकीला

- संशयाची सूई डॉक्टर संतोष पोळवर

- मंगल जेधे शेवटपर्यंत डॉक्टर संतोष पोळच्या संपर्कात

- संशयावरून 12 ऑगस्टला डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

- तपासादरम्यान मंगलचा खून करून फार्महाऊमध्ये मृतदेह पुरल्याची डॉक्टर पोळची कबुली

- 13 ऑगस्टला 5 दिवसांची पोलीस कोठडी

- 2003पासून वाई परिसरातून 5 ते 6 महिला बेपत्ता

- मंगलसह आणखी 5 जणांचे खून केल्याची कबुली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 16, 2016, 11:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading