भारताची धावपटू ललिता बाबरचं आव्हान संपुष्टात

भारताची धावपटू ललिता बाबरचं आव्हान संपुष्टात

  • Share this:

6

15 ऑगस्ट :  रिओ ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीच्या अंतिम फेरीतही भारताला सफलता मिळू शकली नाही. या शर्यतीत ललिताला 10व्या स्थानावर समाधान मानावं लागल्यानं भारताला पदक मिळण्याची आशा मावळली. बुरूंडी देशाची धावपटू रूथ जेबेटनं या स्पर्धेचं सुवर्णपदक पटकावलं. केनियाच्या हायवीन किएंगनं रौप्य, तर अमेरिकेच्या एम्मा कॉबर्ननं कांस्य पदक मिळवलं. ललिताने रिओमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळविताना 9 मिनिटे 19.76 सेकंद वेळ नोंदवताना राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता.

ललितानं हीट-2 मध्ये चांगली सुरूवात केली होती. सुरूवातीच्या 1000 मीटरमधील ललिताची कामगिरी पाहता ती पहिल्या तिघांमध्ये स्थान पटकावेल असे वाटत होते. मात्र, अडथळ्याला धडकून पडल्यामुळे तिची गती मंदावल्यानं तिनं आघाडीचं स्थान गमावलं. त्यानंतर ललिता हरणार असे वाटत असतानाच तिने नेटानं पुनरागमन करत पुन्हा पहिल्या पाचांमध्ये स्थान पटकावलं. पुढं 2500 मीटर धावल्यानंतर तीची गती मंदावली. केनियाची बीटराइस चेपकोच, अमेरिकेची एम्मा कॉबर्न आणि ट्यूनीशियाची हबीबा घिरीबी तिच्या पुढे निघून गेल्या.

ललिताने ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली नसली तरी भारताच्या ऍथलेटिक्स इतिहासात तिची कामगिरी महत्त्वपूर्ण आहे. 32 वर्षांनंतर ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धावणारी ललिता पहिली धावपट्टू ठरली. या अगोदर पी.टी. उषानं अशी कामगिरी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2016 11:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading