दीपा, देशाला तुझा अभिमान आहे - सचिन तेंडुलकर

Samruddha Bhambure | Updated On: Aug 15, 2016 06:24 PM IST

दीपा, देशाला तुझा अभिमान आहे - सचिन तेंडुलकर

15 ऑगस्ट : अवघ्या 0.150 गुणांच्या फरकामुळे ऑलिम्पिक पदकापासून वंचित रहावं लागलेल्या दीपा कर्माकरचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कौतुक केलं आहे. "जिंकणं- हरणं हा खेळाचा भाग असतो, पण तू लाखो मन जिंकली आहेस. तू जे मिळवलसं त्यावर आज संपूर्ण देशाला तुझा अभिमान आहे" अशा शब्दात सचिनने दीपाचं कौतुक केलं आहे.

रविवारी संपूर्ण देशाचे दीपाच्या कामगिरीकडे लक्ष लागून राहिले होते. जिमनॅस्टीक्समधील प्रादुनोवा वॉल्टच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या दीपानेही सर्वोत्तम प्रदर्शन करुन देशवासियांना निराश केलं नाही. फक्त 0.150 गुणांच्या फरकामुळे तिचं कांस्यपदक हुकल्यामुळे सर्वांनाच वाईट वाटलं.

दीपाचे कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण भारतात दुर्लक्षित असलेल्या या खेळासाठी कोणत्याही सोयी-सुविधा नसताना दीपाने जागतिक स्तरावर आपला यशस्वी ठसा उमटवला.

जिमनॅस्टीक्समध्ये प्रादुनोवा वॉल्ट सर्वात धोकादायक प्रकार म्हणून ओळखला जातो. तिथे केलेली एखादी छोटीशी चूकही जीवावर बेतू शकते. अशा सर्व प्रतिकुलतेवर मात करत ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानापर्यंत मजल मारणं खरोखर कौतुकास्पद आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 15, 2016 06:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close