दारू न पिण्याचा सल्ला दिला म्हणून मित्रानंच केली मित्राची हत्या

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2016 01:36 PM IST

दारू न पिण्याचा सल्ला दिला म्हणून मित्रानंच केली मित्राची हत्या

chembur333मुंबई, 13 ऑगस्ट : मित्राला दारू पिऊ नकोस असा सल्ला दिल्यानं आपला जीव गमवावा लागला आहे. कुशल अस या तरुणाचं नाव आहे. अरबाज या त्याच्याच मित्रानं त्याची हत्या केली.

घडलेली हकीकत अशी, गुरुवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास कुशल आपल्या मित्रांसोबत सांताक्रुझ-चेंबुर लिंक रोड जवळ उभा होता. तिथे त्याचा मित्र अरबाज आला. तो खूप दारू प्यायला होता. जास्त दारू पित जाऊ नको असा सल्ला कुशलने दिला. पण मित्राच्या या सल्ल्यामुळे  मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अरबाजला राग आला, आणि त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्रानं तकुशलवर वार केले.

या हल्ल्यात कुशल गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. कुशलला वाचवायचा प्रयत्न करणार्‍या एक मित्रही यात घटनेत गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी आरोपी अरबाजला अटक करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2016 01:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...